Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज

श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज

मुख्याधिकारी बालाजी लोंढे

marathinews24.com

बारामती – श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे माळेगाव बु. नगरपंचायत शहरात १७ जुलै २०२६ रोजी आगमन होणार असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली आहे.

‘सूर्यदत्त’च्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य भारती – सविस्तर बातमी 

पालखी सोहळा येणाऱ्या वारकऱ्यांसाठी नगरपरिषदेच्यावतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नगरपंचायत युद्धपातळीवर काम करत आहे. संपूर्ण पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे भरणे, रस्त्यांची स्वच्छता, धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत. शहरातील सर्व पथदिवे सुस्थितीत सुरू राहतील तसेच स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. शहरातील हातपंप दुरूस्त करून विंधन विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु आहे.

पालखी मार्गावरील स्वच्छतेचे काम नगरपंचायतीमार्फत सुरु असून १५ व १६ जुलै रोजी नगरपंचायत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बु. आणि पोलीस प्रशिक्षण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानाचे करण्यात येणार आहे.

नगरपंचायत कार्यालयाशेजारी पालखी विसाव्याच्या ठिकाणी असलेले मंडप, सेल्फी पॉइन्ट, आदी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व दिंड्यांना टँकरने पाणी भरण्याकरिता जलशुद्धीकरण केंद्र, माळेगाव बु. नगरपंचायत याठिकाणी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नगरपंचायत मार्फत आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ X ७ कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच हेल्पलाईन क्र.०२११२-२५४००१ कार्यान्वित करण्यात आला आहे.

यंदाही ‘हरित वारी-सुरक्षित वारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून याअंर्तगत पालखी मार्गावरील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायतीचे संपूर्ण पदाधिकारी,अधिकारी- कर्मचारी वर्ग पालखी नियोजनसाठी काम करीत आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत शिबीर आयोजित करण्यात येणार असून सर्व वारकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. प्लास्टिक मुक्त, तंबाखुमुक्त शहर ठेवण्यासाठी व सुरक्षित पालखी सोहळ्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×