Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

तरुणाला मारहाण करीत दुचाकी चोरणार्‍याला अटक

तरुणाला मारहाण करीत दुचाकी चोरणार्‍याला अटक

दोघे अल्पवयीन ताब्यात

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार तरूणाचा पाठलाग करून त्याला मारहाण करीत लुटणार्‍याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दीड लाखांची दुचाकीसह अडीच लखांचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ही घटना ८ एप्रिल २०२५ रोजी हडपसर परिसरातील शेवाळेवाडीजवळ घडली होती. शुभम सचिन सोनवणे (वय १९ रा. मुंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे जिल्ह्यात दुभती जनावर चोरणार्‍या टोळीला अटक;५ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी 

दुचाकीस्वार तक्रारदार हे ८ एप्रिलला शेवाळेवाडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर ट्रिपल सीट बसून आलेल्या तीन अनोळखींनी तरूणाला मारहाण केली. त्यांच्याकडील दीड लाखांची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, दिपक कांबळे, बापू लोणकर,अमित साखरे, महावीर लोंढे, अमोल दणके यांच्या पथकाने तपास सुरू केला. अंमलदार महावीर लोंढे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शुभम सोनवणे याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने तरूणाला अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने लुटल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकीसह अडीच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे, एसीपी अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, संदीप राठोड, दिपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापु लोणकर, अमित साखरे, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महाविर लोंढे, आकाश धावडे, विजय कानेकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×