पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेचे मंगळसूत्र चोरले

पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेचे मंगळसूत्र चोरले

येरवडा ते कात्रज बसस्थानक प्रवासादरम्यान घडली घटना 

marathinews24.com

पुणे – पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेचे मंगळसूत्र चोरले – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील १५ हजारांचे मंगळसूत्र चोरून ेनेले. ही घटना ३१ जुलैला सकाळी साडेअकराच्या सुमारास येरवडा ते कात्रज बसस्थानक प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी लोहगावमध्ये राहणार्‍या जेष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार – तरुणाची प्रकृती गंभीर; नगर रस्त्यावरील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला लोहगावमध्ये राहायला असून, ३१ जुलैला सकाळी साडेअकराच्या सुमारास येरवडा ते कात्रज असा बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १५ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. बसमधून उतरल्यानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे तपास करीत आहेत.

टोळी सक्रिय, महिला प्रवाशांमध्ये धास्ती

शहरातील मध्यवर्ती भागासह उपगनरातून पीएमपीएल बसप्रवास करणार्‍या जेष्ठ महिलांना लक्ष्य करीत चोरटे दागिने हिसकावून नेत आहेत. मागील काही दिवसांपासून टोळी सक्रिय झाली असून, महिला प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सक्रिय झालेल्या टोळीला अटक करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

पादचारी जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून गर्दीच्या ठिकाणी त्यांना धक्का मारून चोरट्याने ६५ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. ही घटना १६ डिसेंबरला सकाळी पावणेसातच्या सुमारास वानवडीतील जगताप चौकात घडली आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने नुकतीच फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ८५ वर्षीय महिला वानवडीत राहायला असून, १६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास पायी जात होती. त्यावेळी चोरट्याने त्यांचा पाठलाग करून महिलेला जगताप चौकात गाठले. त्याठिकाणी गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने महिलेला धक्का देउन त्यांच्या गळ्यातील ६५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी पोलीस अमलदार क्षीरसागर तपास करीत आहेत.

हडपसरमध्ये घरात शिरून ऐवजाची चोरी

उघडा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात शिरून रोकड, लॅपटॉप, मोबाइल असा ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ३० जुलैला संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास हडपसरमधील तिरूमला हाईटस इमारतीत घडली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसरमधील तिरूमला हाईटस इमारतीत राहायला आहेत. ३० जुलैला रात्री सव्वा सातच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून ५ हजारांची रोकड, लॅपटॉप, मोबाइल असा ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, घरातील साहित्य खाली पडल्याचे पाहून तक्रारदाराला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार आर. एम. करंजकर तपास करीत आहेत.

ट्रकमधून साडेचार लाखांचे साहित्य चोरले

ट्रकमधून साडेचार लाख रूपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना १३ ते २८ जुलैला येवलेवाडीतील पानसरेनगरात घडली आहे. याप्रकरणी कर्नाटकातील तक्रारदाराने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मूळचा कर्नाटकचा असून, त्याचा ट्रक जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबंधिताने हा ट्रक येवलेवाडीतील पानसरेनगरात उभा केला होता. दरम्यानच्या कालावधीत १३ ते २८ जुलैला चोरट्यांनी जळालेल्या ट्रकमधील ४ लाख ५० हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×