Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

देवदर्शनसाठी गेलेल्या जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

पोलीस चौकीत राडा; तिघांविरुद्ध गुन्हा

वडगाव शेरीतील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करीत त्यांचे दागिने हिसकावून नेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून, दुचाकीस्वार चोरट्यांचा अटकाव करण्याची मागणी केली जात आहे. विशेषतः सकाळी व्यायामासाठी आणि संध्याकाळी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांचा पाठलाग करून दागिने हिसकावून नेले जात असल्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, वारंवार घडणार्‍या घटनांमुळे दुचाकीस्वार चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मुंढव्यातील केशवनगरातून रिक्षा चोरीला – सविस्तर बातमी

मैत्रिसोबत देवदर्शनासाठी पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २० ऑक्टोबरला पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरीतील दत्त मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी खराडीत राहणार्‍या ६६ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला खराडीत राहायला असून, २० ऑक्टोबरला पहाटे सव्वा पाचच्या सुमारास मैत्रिणीसोबत त्या देवदर्शासाठी जात होत्या. त्यावेळी जुना मुंढवा रस्त्यावरील रिलायन्स मार्टजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तक्रारदार महिलेला गाठले. त्यांच्या गळ्यातील तब्बल १ लाख १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलांनी आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×