हडपसरमधील सातववाडीतील घटना
marathinews24.com
पुणे – लग्नात मनासारखा हुंडा दिला नाही, मानपान केला नसल्याच्या रागातून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तिला सतत टोचून बोलत अपमान केला. त्यामुळे शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना १९ मे रोजी हडपसरमधील सातववाडीत परमानंद इमारतीत घडली आहे. याप्रकरणी पतीसह इतर नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२ रा. सातववाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गुरूसंगप्पा म्यागेरी (वय ५३, रा. कर्नाटक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
धक्कादायक…विजेचा शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा आणि प्रसाद यांचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. लग्नांनतर दीपा हडपसरमधील सातववाडीत सासरी नांदत होती. काही दिवसानंतर सासरच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली. लग्नात मनासारखा हुंडा दिला नाही, मानपान केला नसल्याच्या रागातून तिला सतत टोचून बोलत अपमान केला. त्यामुळे शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून दीपाने १९ मे रोजी सातववाडीतील राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी तिचे वडील गुरूसंगप्पा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सासरच्या लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करीत आहेत.