पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विवाह मंडपात पाटाखाली लिंबे सापडल्याने काळी जादू केल्याचा आरोप करुन सासरकडील नातेवाईकांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसंनी पती, सासूसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २५ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती, सासू यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अफुच्या बोंडाचा चुरा बाळगणारा तस्कर अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीचे अंबरनाथ येथील तरुणाशी मे २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहातील विधी करताना तरुणीच्या पाटाखाली दोन लिंबे सापडली होती. विवाह समारंभ पार पडल्यानंतर तरुणी सासरी गेल्यानंतर विवाहात पाटाखाली सापडलेली लिंबे, कौटुंबिक वादातून तरुणीला टोमणे मारण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ सुरू करीत मारहाण केली. जाचामुळे कंटाळून तरुणी माहेरी निघून आली. त्यानंतर तिने नुकतीच काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
विवाहितेचा छळाप्रकरणी आणखी एक गुन्हा
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे. विवाहानंतर तरुणीचा छळ सुरू करण्यात आला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. विवाहात दिलेले दागिने काढून घेतले. पैसे न दिल्यास घर सोडून जा, अशी धमकी पती, सासू, नणंदेने दिल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे.