Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

विवाहित महिलेचा छळ; गरम भाजीची कढई फेकून मारली

विवाहित महिलेचा छळ; गरम भाजीची कढई फेकून मारली

नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नऱ्हे परिसरात नवीन घर खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी विवाहितेला जबर मारहाण करत गॅसवर उकळत असलेली भाजीची गरम कढई तिच्या अंगावर फेकून मारली. याप्रकरणी पती कमलेश संपत शिंदे (वय ३९ वर्षे), सासू उषा संपत शिंदे (वय ५९ वर्षे), सासरे संपत भाऊ शिंदे (वय ६० वर्षे, सर्व रा. नऱ्हे, पुणे), पतीची बहीण मनिषा जगताप आणि मावसबहीण धनश्री महाडीक यांच्यावर नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवाहित फिर्यादी महिला (वय ३८ वर्षे, रा. नऱ्हे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला बेड्या; हडपसर पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा छळ दि. २४ मे ते दि. २८ जून या कालावधीत घडला. आरोपींनी फिर्यादी विवाहितेला नवीन घर घेण्यासाठी माहेरून वडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी आणि लग्नात दिलेले दागिने विकून नवीन फ्लॅट घेण्यासाठी तगादा लावला. विवाहितेने दागिने देण्यास नकार दिला असता आरोपींनी संगनमत करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला अमानुष मारझोड करून तिचे दागिने स्वतःजवळ ठेवून त्याचा अपहार केला. इतकेच नव्हे तर आरोपींनी विवाहितेवर रागाच्या भरात स्टीलचा ग्लास फेकून मारला आणि गॅसवर शिजत टाकलेली भाजीची कढई विवाहितेच्या अंगावर फेकून मारली. नऱ्हे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×