Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

शेततळयामध्ये पडून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना जारी

शेततळ्यातील दुर्घटना रोखण्यासाठी कृषी विभागाच्या महत्त्वपूर्ण सूचना

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकाची अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सुचनानूसार शेततळयामध्ये पडून जीवित हानी सारख्या होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करावे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

रक्षाबंधन सणानिमित्त बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन – सविस्तर बातमी

त्याअन्वये शेततळ्याभोवती मजबूत व सुरक्षित कुंपण करणे, जेणेकरून लहान मुले, अनधिकृत व्यक्ती व जनावरे अनावधानाने शेततळ्यात प्रवेश करणार नाहीत. तारेचे कुंपण करणे संबंधित शेतकऱ्यास आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यास, शेततळ्याभोवती स्थानिक हवामान व जमिनीच्या परिस्थितीस अनुकूल अशा काटेरी, संरक्षक वनस्पतींची लागवड करून जैविक कुंपण करण्यात यावे जेणेकरून कोणीही अनावधानाने शेततळ्यात प्रवेश करणार नाही.

शेततळ्याच्या सुरक्षित भागावर आपत्कालीन परिस्थितीत पकडण्यासाठी उपयोगी पडतील असे काठावर गाठी मारलेले मजबूत दोरखंड लावावेत. शेततळ्याच्या दर्शनी भागात “धोका शेततळ्यात बुडून जीवितहानी होऊ शकते” अशा आशयाचा स्पष्ट, मोठ्या अक्षरातील व सहज दिसणारा चेतावणी फलक लावावा आणि त्यावर स्थानिक रुग्णवाहिका (108) व तसेच संबंधित पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक ठळक अक्षरात नमूद करावा.

प्लास्टिक अस्तरीकरण केलेल्या शेततळ्याच्या उतारावर आवश्यकतेनुसार दोरखंडाची चौकोनी जाळी, सुरक्षित पकड व्यवस्था करणे, ज्यामुळे घसरलेल्या व्यक्तीस बाहेर येण्यासाठी आधार मिळू शकेल. आवश्यकतेनुसार शेततळ्याच्या ठिकाणी तरंगते, बचावासाठी उपयोगी साधन (उदा. ट्यूब, दोरखंड, सुरक्षितरीत्या बांधलेले प्लास्टिकचे रिकामे कॅन इत्यादी) उपलब्ध ठेवावेत. शेततळ्याच्या परिसरात लहान मुलांना व अनधिकृत व्यक्तींना प्रवेश होणार नाही, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक व्यवस्था करावी, असेही श्री. काचोळे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×