Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी मेधा कुलकर्णी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी मेधा कुलकर्णी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा – गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन खासदार मेधा कुलकर्णीनी केली मागणी

marathinews24.com

पुणे – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मुर्त्यमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, जगदाळे यांची कन्या व हल्ल्यातील पीडित आसावरी यांना शासकीय नोकरीत रुजू करून घ्यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती करणारे निवेदन मेधा कुलकर्णी यांनी दिले.

शाश्वत भूजल व्यवस्थापनावर १७ फेब्रुवारीला यशदा येथे राज्यस्तरीय कार्यशाळा – सविस्तर बातमी 

मेधा कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी यासंदर्भात विनंती केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगदाळे कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांची कन्या आसावरी जगदाळे हिला सहानुभूती तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याचे सांगण्यात आले होते.

आसावरी जगदाळे या शैक्षणिकदृष्ट्या पात्र असून, त्यांनी भारती विद्यापीठ येथून मानव संसाधन व्यवस्थापनात (एचआर) एमबीए, तसेच एच. व्ही. देसाई महाविद्यालयातून संगणकशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी घेतली आहे. तसेच खासगी क्षेत्रातील अनुभवही त्यांच्याकडे आहे. त्यांना सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नऊ महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही आणि कुटुंबाने वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही औपचारिक माहिती किंवा प्रगती कळविण्यात आलेली नाही. या विलंबामुळे कुटुंबाला मानसिक त्रास व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

पूर्वी आश्वासन दिलेल्या पदावर किंवा पर्यायी स्वरूपात पात्रतेनुसार पुणे महापालिका किंवा राज्य शासन सेवेत योग्य नोकरी देण्याचा विचार करावा, अशी मागणी करत या प्रकरणात तातडीने योग्य कार्यवाही करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×