अल्पवयीनाकडून पिस्तुल जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड असा ५० हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना कात्रजकडुन मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर एकजण गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा शस्त्रसाठा जप्त केला.
अल्पवयीन आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.