अल्पवयीन चोरटा गजाआड; पाच गुन्हे उघड
marathinews24.com
पुणे – दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपीने हडपसर परिसरातून ४ आणि सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा ५ दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशीना अटक – सविस्तर बातमी
वाहन चोरी रोखण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट पाचचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या आदेशान्वये कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत फिरत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने विधीसंघर्षित बालकासह त्याच्या पालकासह युनिट कार्यालयात आणुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला. चौकशीत त्याने ५ वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, शहाजी काळे, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.