Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात कॅफेतील गैरवर्तन भोवले; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

पुण्यात कॅफेतील गैरवर्तन भोवले; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

डेक्कन जिमखाना भागातील घटना

marathinews24.com

पुणे – रात्रपाळीत डेक्कन जिमखाना भागातील एका कॅफेत केलेेले गैरवर्तन पोलीस उपनिरीक्षकाला भोवले. काठीने काॅफीचे ग्लास फोडून गैरवर्तन केल्याची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसाेडे यांनी दिले. संदीप कदम असे निलंबित केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. कदम हे डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ६ जून रोजी पोलीस उपनिरीक्षक कदम हे रात्रपाळीत नियुक्तीस होते.

पुणे विभागात खताच्या काळाबाजार व साठेबाजीविरोधात कृषी विभागाची मोठी कारवाई – सविस्तर बातमी 

डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्त्यावरील फ्लाईंग जिप्सी हे कॅफे मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. रात्रपाळीत गस्त घालणारे कदम यांनी कॅफे सुरू असल्याचे पाहिले. त्यानंतर ते कॅफेत गेले. कॅफेतील टेबलवर ठेवलेले काॅफीचे कप, तसेच खाद्यपदार्थ काठीने पाडून टाकले. कॅफेत असलेल्या ग्राहकांना जाण्यास सांगितले. कॅफेतील कर्मचाऱ्यांना अरेरावी केली. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. कदम यांचे वर्तन शिस्तीला तडा देणारे आहे. तसेच बेजबाबदारणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली, असा ठपका ठेऊन कदम यांनीा निलंबित करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.

शहरातील पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री दहापूर्वी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट चालकांना ठरवून दिलेल्या वेळेत व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई करताना थेट हाॅटेलमध्ये शिरु नये, व्यवस्थापाकाला बाहेर बोलावून सूचना द्यावी, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सहायक पोलीस निरीक्षकाला धमकाविणारा हवालदार निलंबित

सहायक पोलीस निरीक्षकाला धमकाविणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला यांनी दिले. विवेक रमेश बसनगार असे निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. हवालदार बसनगार हे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. कर्तव्यावर असताना हवालदाराने अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेची दखल घेऊन १० मार्च रोजी कसुरी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला होता.

त्यावेळी हवालदार बनसगार यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर बसनगार याने शिक्षा दिल्याचा राग धरून २६ जून रोजी खडकी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना शिवीगाळ केली. त्यानंतर २७ जून रोजी बसनगार हे खडकी पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कक्षात आले. या घटनेची ‘स्टेशन डायरी’त नोंद का केली ? अशी विचारणा करुन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सोमवारी (२९ जून) तपास कक्षातील सहायक निरीक्षक खडकी पोलीस ठाण्याच्या आवारात आले. तेव्हा बसनगार याने धोकादायक पद्धतीने दुचाकी चालविली. त्यांना सहायक निरीक्षकाला धमकावले. या घटनेची गंभीर दखल घेऊन बसनगार यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देेण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×