भवानी पेठेतील प्रकार; खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील भवानी पेठेतील किराड आळीमध्ये राहत्या घरात चार्जींगसाठी लावलेला मोबाईल चोरट्यांनी चोरी करून नेला. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास समोर आला. याबाबत एका 60 वर्षीय महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीतून उडी मारुन तरुणीची आत्महत्या – सविस्तर बातमी
कोंढव्यात मोहत्सवातून चोरी
कोंढव्यातील कौसरबागेत भरलेल्या एका महोत्सव वजा प्रदर्शनातून 100 डॉलवर व 500 रूपये रोखक रक्कम सो्न्याची रिंग व इराण देशाचे ओळखपत्र बुरखा घातलेल्या दोन महिलानीचोरी करून नेले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 28 फेब्रुवारी रोजी 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
क्रेडीटकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्रेडीटकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने एपीके फाईल पाठवुन ती डाऊनलोड करण्यास सांगून विश्वास संपादन करत तब्बल 5 लाख 94 हजार रूपये पाठविण्यास सांगून फसवणूक केली. याप्रकरणी मोबाईलधारक व विविध बँकधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 57 वर्षीय महिलेनी बिवबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिसनिरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे करत आहेत.























