नागपूरनंतर पुण्यात ‘कंट्रोल रूम ऑन व्हील्स’
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था आणि अनुचित घटना टाळण्यासह गर्दीच्या ठिकाणी योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवता यावे, यासाठी पुणे पोलिस दलात लवकरच अत्याधुनिक मोबाईल सर्वेलन्स व्हेईकल दाखल होणार आहे. संरक्षण दलासाठी वाहनांची निर्मिती करणाऱ्या बंगळुरू येथील कंपनीकडून पुणे पोलिसांसाठी ५ वाहने मागवण्यात आली आहेत. नागपूरनंतर पुण्यात ‘कंट्रोल रुम ऑन व्हील्स’ हे वाहन दाखल होणार आहे. पोलिस
आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल सर्वेलन्स व्हेईकल वॉच ठेवणार आहेत.
पुण्यातील बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे गुगल मॅपवर बदलले नाव – सविस्तर बातमी
राजकीय सभा, रॅली, मिरवणुका, आंदोलने, गणपती उत्सव, पालखी सोहळ्यासह विविध महत्त्वाच्या ठिकाणी संबंधित वाहनांचा उपयोग पोलिसांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मोबाईल सर्वेलन्स व्हेईकलमध्ये वायरलेस मिनी कंट्रोल रूम असुन, वाहनाच्या चारही बाजूंनी चार कॅमेरे, पीटीझेड कॅमेरा (जो ३६० डिग्रीमध्ये फिरणार आहे), सीसीटीव्ही मॉनिटरिंग कंट्रोल रूम, आयपी स्पीकर्स, सीसीटीव्ही मॉनेटरिंग करता येईल अशी यंत्रणा आहे.
ड्रोनचा वापर देखील करता येणार
मोबाईल सर्वेलन्स व्हेईकलमधून ड्रोन ऑपरेट करता होईल अशी रचना केली आहे. वाहनात ड्रोन ऑपरेटर असून, गर्दिच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे केले जाणारे चित्रिकरण लाईव्ह दिसणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील आरोपी, गर्दीत शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती देखील अँनालिटिक्स सर्व्हर कॅमेऱ्यांद्वारे डिटेक्ट होण्यास मदत मिळणार आहे. वाहनात छोटेखानी मीटिंग रूम बनवली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणे शक्य होणार आहे. यासाठी वाहनात इंटरनेट आणि एलईडी स्क्रीन देखील लावली आहे.