Breking News
अल्पवयीन मुलाच्या खुनप्रकानी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा२२ मोबाइल, ६ दुचाकी चोरणार्‍याला अटक, अल्पवयीन ताब्यातशेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावलमित्राने अनैसर्गिक संबंध ठेऊ दिले नाही, वादातून केला खूनएटीएम कार्डचा गैरवापर, दोन महिलांची ९० हजारांची फसवणूकपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेला २२ लाखांचा गंडाबारामतीत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहातसीबीआय ऑफिसर बोलत असल्याची केली बतावणीमित्राचा गळा आवळून ठार मारले, दोन महिन्यांनी खूनाला वाचाअवैध वाळू उपसा करणार्‍या सराईताविरूद्ध कारवाईचा बडगा

शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल यशस्वी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल घेण्यात आले. या सर्व ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली.

शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन द्याव्यात – व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर – सविस्तर बातमी

यावेळी विधान भवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, अपर आयुक्त अरुण आनंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 डुडी म्हणाले, या मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. सुरुवातीला भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट करण्यात आला, त्यानंतर अश्रू धूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याप्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले. यानुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती. सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद दिला. आरोग्य यंत्रनेने आरोग्य सुविधा रुग्णवाहीका सेवा वेळेत उपलब्ध करुन देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. मॉक ड्रिलची सर्व प्रक्रिया २५ ते ६० मिनिटात पूर्ण करण्यात आली.

ग्रामीण भागातील लोकांमध्ये या मॉक ड्रिलद्वारे जनजागृती होण्यासाठी तेथील सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक नागरिक यांनीही यात सहभाग घेतला होता. या मॉक ड्रिलमध्ये खूप कमी वेळात प्रशासनाने तयारी करुन सर्व विभागांनी आपाआपली जबाबदारी, नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने पार पाडले.

विधानभवन प्रांगण, पुणे महानगरपालिका प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारत, वनाज औद्योगिक परिसर, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगरपरिषद या शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये संरक्षण दल, नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ, पोलीस, महसूल, आरोग्य, नगरपालिका, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थान विभाग, रेड क्रॉस सोसायटी, तसेच संबंधित शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्टीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरु युवा केंद्राचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मॉक ड्रिल दक्षता म्हणून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top