‘मोगरा फुलला’ उत्सव मॉरिशस येथे यशस्वीरीत्या संपन्न

‘मोगरा फुलला’ उत्सव मॉरिशस येथे यशस्वीरीत्या संपन्न

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मॉरिशसमध्ये मराठी संस्कृतीचा जागतिक उत्सव

marathinews24.com

पुणे – संतसाहित्यावरील  ‘मोगरा फुलला’ हाभव्य सांस्कृतिक सोहळा समुद्राच्या कुशीत वसलेल्या मॉरिशस येथे १ मार्च २०२६ रोजी सर्ज कॉन्स्टंटीन थिएटर येथे उत्साहात संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या सुवर्णक्षणाच्या निमित्ताने हा विशेष उपक्रम स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता.

सिंहगडावर राजाराम महाराज जयंतीचा जल्लोष – सविस्तर बातमी 

या सोहळ्यामुळे जगभरातील मराठी रसिक एका सांस्कृतिक धाग्यात गुंफले गेले. गेल्या सुमारे २०० वर्षांपासून मॉरिशसमध्ये मराठी संस्कृती जपली जात असल्याने या कार्यक्रमासाठी मॉरिशसची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनने केले. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे आणि प्रसिद्ध गायिका सिन्मिता धापटे-शिंदे यांनी संतसाहित्यावर आधारित व्याख्यान आणि संगीतमय सादरीकरण सादर केले. तसेच शुभांगी शिंदे यांनी ‘मी महाराष्ट्र बोलतोय’ हे प्रभावी स्वागत सादर केले. मराठी भाषेशी जोडणाऱ्या विविध उपक्रमांचा समृद्ध अनुभव रसिक प्रेक्षकांना मिळाला. महाराष्ट्र आणि मॉरिशसमधील मराठी रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला मॉरिशसचे कला आणि संस्कृती मंत्री महेंद्र गोंदिया, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष  धनीराव भवाजी, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष  बलराज नारू, मॉरिशस मराठी स्पीकिंग युनियनचे अध्यक्ष भालचंद्र गोविंद, स्वान फाऊंडेशनचे सचिव विकास टाकळीकर आणि सचिव  प्रसादराजे भोपळे उपस्थित होते.

यावेळी स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी हा उपक्रम विविध देशांमध्ये नेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच एप्रिल महिन्यात लंडन येथे डॉ. बी. आर. आंबेडकर डिबेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय लवकरच मॉरिशसमध्ये आंतरराष्ट्रीय युथ फेस्टिव्हल आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली.

‘मोगरा फुलला’ हा सोहळा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम ठरला नाही, तर जागतिक पातळीवर मराठी अस्मिता, संत परंपरा आणि भाषिक अभिमान यांचे प्रभावी दर्शन घडवणारा ऐतिहासिक क्षण ठरला. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत मराठी संस्कृतीचे जागतिक बंध अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. मराठी संस्कृतीची सुवासिक परंपरा सीमारेषा ओलांडून जगभर फुलत राहो, अशी भावना या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×