फिरोज शेख टोळीवरही कारवाईचा दणका
marathinews24.com
पुणे – दबाबतंत्राचा वापर करून जमिनीवर ताबेमारी करणार्या सराईत गुंड रिजवान उर्फ टिपू (टिप्या) सत्तार पठाण ( वय ३४ रा. बिल्डींग ख्वाजा, मंजिल, बी 5, सय्यदनगर,हडपसर) याच्यासह टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. टिप्या व त्याच्या साथीदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत व मारामारी अशा प्रकारचे शहरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. इजाज सत्तार पठाण ( वय ३९), नदीम बाबर खान (वय ४१ ), सद्दाम सलीम पठाण (वय २९ ), एजाज युसूफ इनामदार-पटेल (वय ३३ ), इरफान नासीर शेख (वय २६, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) व साजीद झिब्राईल नदाफ (वय २६ , रा. आयशा मस्जीदसमोर, सय्यदनगर, हडपसर) अशी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन – सविस्तर बातमी
आरोपींनी टोळी तयार करून आर्थिक लाभासाठी परिसरामध्ये आपली दहशत पसरवली आहे. जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्र, घातक हत्यारांसह जबरी चोरी, दरोडा, खंडणी, अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. टिप्याची पैसे उधळणारी क्लीप नुकतीच समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. त्याने ताबेमारी केल्याचेही काही प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याचमुळे त्याची धिंड काढुन त्याला लोकवस्तीत फिरविण्यात आले होते.
खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारे स्वतःजवळ बाळगुन दहशत पसरविणे असे गंंभीर गुन्हे दाखल असलेल्या फिरोज शेख टोळीवरही मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात फिरोज महमंद शेख (वय २९, रा. कदम वाकवस्ती), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २०, रा. माळीमळा, लोणी काळभोर), अस्लम अन्वर शेख (वय २५ रा. जयहिंदनगर झोपडपट्टी, लोणीस्टेशन), आदित्य प्रल्हाद काळाणे (रा. लोणीस्टेशन) यांच्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांवरही मोक्काची कारवाई केली आहे. या दोन्ही प्रकरणाचे प्रस्ताव स्थानिक पोलिसांनी तयार केले होते. मोक्काचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. दोन्ही प्रस्तावाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुरी देण्यात आली. पोलिस आयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यात परिमंडळ पाचमध्ये 6 मोक्काच्या कारवाया केल्या आहेत.