Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

मनी लॉड्रींग केसची केली बतावणी, १७ लाखांचा गंडा

मनी लॉड्रींग केसची केली बतावणी, १७ लाखांचा गंडा

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टेलीकॉम विभागातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ७९ वर्षीय नागरिकाला तब्बल १७ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १२ ते १९ डिसेंबर २०२५ कालावधीत शिवाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकासह बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जेष्ठाला अटक करण्याची घातली भीती, ३६ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक शिवाजीनगर परिसरात राहायला असून, १२ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. टेलीकॉम विभागातून बोलत असल्याची बतावणी करीत, तुमच्याविरूद्ध मनी लॉड्रींगची केस असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराचा विश्वास संपादित करून त्यांना पैसे पाठवण्यास सांगितले. तब्बल १७ लाख रूपये पाठवल्यानंतर जेष्ठाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करीत आहेत.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १५ लाखांना

शेअर ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने ४६ वर्षीय नागरिकाला १५ लाख १० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २ ते २८ ऑक्टोबर २०२५ कालावधीत आनंद भवनात घडली आहे. सायबर चोरट्याने तक्रारदाचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांना रक्कम पाठवण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरण गायकवाड तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×