Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

जेष्ठाला अटक करण्याची घातली भीती, ३६ लाखांचा गंडा

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

नांदेडसिटी पोलीस ठाण्यात दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला दहशतवाद्यांसाठी पैसे पाठवत असल्याचा आरोप केला. संबंधित प्रकरणात अटकेची भीती दाखवून तब्बल ३६ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. ही घटना ८ ते १६ डिसेंबर २०२५ कालावधीत धायरीत घडली आहे. याप्रकरणी ७९ वर्षीय जेष्ठ नागरिकाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७९ वर्षीय असून धायरीत राहायला आहेत. ८ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून पोलीस असल्याची बतावणी केली. तक्रारदार जेष्ठाच्या मोबाइलद्वारे अनेकांना अश्लील कॉलसह पॉर्नग्राफी केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. तसेच बँक खात्यातून दहशतवाद्यांसाठी पैसे पुरवले जात असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पत्र पाठवून, तक्रारदाराला अटक करण्याची भीती दाखवण्यात आली.

सायबर चोरट्यांनी जेष्ठ तक्रारदाराकडून सर्व बँक खात्याची माहिती घेतली. संबंधित बँक खात्यातील रकमांची पडताळणी करण्यासाठी पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदारावर दबाव टाकून त्यांना दिलेल्या बँकखात्यात रक्कम जमा करण्यास भाग पाडले. तब्बल ३६ लाख रूपये जमा केल्यानंतरही सायबर चोरटे त्यांच्याकडून रकमेची मागणी करीत होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×