डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

मुंढवा-मांजरी रस्त्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा-मांजरी रस्त्यावर घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा केला खून – सविस्तर बातमी

भूषण कैलास अहिरराव (वय ३५, रा. अर्थव काॅम्प्लेक्स, मांजरी बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबबात भूषण यांचे भाऊ पंकज कैलास अहिरराव (वय ३२) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार भूषण आणि त्यांचा भाऊ पंकज हे खासगी ठिकाणी नाेकरी करतात. सोमवारी (२२ डिसेबर) रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीस्वार पंकज आणि त्यांचा भाऊ पंकज हे मुंढवा-मांजरी रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार भूषण हे गंभीर जखमी झाले. त्यांचा भाऊ पंकज हे फेकले गेल्याने त्यांना दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपरचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या भूषण आणि त्यांचा भाऊ पंकज यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भूषण यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या डंपर चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×