Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पसंती क्रमांकाद्वारे ११ कोटी रुपयाहून अधिक महसूल जमा

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

marathinews24.com

बारामती – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनांकरिता पसंती क्रमांक मिळण्याबाबत जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १० हजार २६८ अर्ज स्विकारण्यात आले असून त्यातून ११ कोटी १ लाख इतका महसूल प्राप्त झाला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, सेवा सुलभीकरण, पारदर्शकप्रक्रिया आणि विभागातील कार्यक्षम अंमलबजावणीमुळे वाढ झाली आहे.

पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न – सविस्तर बातमी

वाहनाकरिता पसंती क्रमांक जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण ४ हजार ९१९ अर्जाच्या माध्यमातून ४ कोटी १८ लाख तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्राप्त ५ हजार ३४९ अर्जाच्या माध्यामातून ६ कोटी ८३ लाख इतका महसूल प्राप्त झाला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात पसंती क्रमांकाच्या माध्यमातून प्राप्त महसुलात सुमारे ६३ टक्क्यांनी वाढ तसेच वाहन क्रमांक वाटपाच्या संख्येतही सुमारे ९ टक्क्यांची वाढ झाली आहे, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×