Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

मोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज

सखोल जिओटेक्निकल व फॉरेन्सिक तपासणीची गरज – PSEA

marathinews24.com

पुणे – मोशी येथील दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) चे अध्यक्ष इंजि. शेषराव कदम तसेच PSEA समितीच्या सदस्यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्राथमिक दृश्य पाहणी केली.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट – सविस्तर बातमी

प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे असे दिसून येते की, सततच्या पावसामुळे इमारतीलगत साठविण्यात आलेला घनकचऱ्याचा मोठा ढीग आणि त्याखालील जमीन पूर्णपणे पाण्याने संतृप्त झाली होती. हा घनकचरा बाधित इमारतीपासून अंदाजे ३० मीटर अंतरावर होता असे निदर्शनास आले.

प्राथमिक निरीक्षणानुसार, पावसाच्या पाण्यामुळे घनकचरा आणि त्याखालील मातीची शीअर स्ट्रेंग्थ (Shear Strength) मोठ्या प्रमाणात कमी झाली असावी. त्यामुळे हा संतृप्त घनकचरा द्रवरूप पदार्थाप्रमाणे इमारतीच्या दिशेने सरकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनास्थळी पाहणीदरम्यान इमारतीचे मुख्य संरचनात्मक घटक (Structural Elements) बहुतांश शाबूत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही दुर्घटना इमारतीच्या अपुऱ्या संरचनात्मक क्षमतेमुळे झाली असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून येत नाही.

संतृप्त घनकचरा इमारतीमध्ये प्रवेश करून त्याने संरचनेवर मोठ्या प्रमाणात आडवा दाब (Lateral Force) निर्माण केला. या अतिरिक्त दाबामुळे इमारतीचे संतुलन बिघडून ती उलटली (Overturning) असावी, असा प्राथमिक अंदाज PSEA ने व्यक्त केला आहे.

मात्र, या दुर्घटनेचे नेमके कारण, संतृप्त घनकचऱ्याचा उगम, त्याचा प्रवाह, हालचालीचा मार्ग तसेच जमिनीची स्थिती याबाबत अंतिम निष्कर्ष केवळ सखोल जिओटेक्निकल (Geotechnical) आणि फॉरेन्सिक (Forensic) तपासणीनंतरच काढता येईल, असे PSEA ने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अशा नैसर्गिक किंवा संरचनात्मक आपत्कालीन परिस्थितींमध्ये तांत्रिक मार्गदर्शन आणि तज्ज्ञांची तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी PSEA ने नुकताच इमर्जन्सी हेल्प सेल सुरू केला असून, आवश्यकतेनुसार प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना तांत्रिक सहकार्य देण्याची तयारी संघटनेने दर्शविली आहे.

PSEA ची आपत्कालीन मदत कक्ष (Emergency Help Cell) सुरू

नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस, पूर, वादळी वारे, इमारत दुर्घटना, भूस्खलन तसेच इतर संरचनात्मक आपत्कालीन परिस्थितींमध्ये तांत्रिक मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचे सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन (PSEA) ने ‘PSEA Emergency Help Cell’ सुरू केला आहे. या हेल्प सेलमध्ये अनुभवी स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, फील्ड एक्स्पर्ट्स, निवृत्त पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय तज्ज्ञांचा समावेश असून, घटनास्थळी तांत्रिक मार्गदर्शन, इमारतींचे प्राथमिक संरचनात्मक मूल्यांकन, नुकसानाचे परीक्षण, संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय तसेच आवश्यक तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या हेल्प सेलची सेवा केवळ PSEA सदस्यांसाठी मर्यादित नसून, गरज भासल्यास कोणताही नागरिक, गृहनिर्माण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय विभाग या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

आपत्कालीन मदतीसाठी संपर्क :
☎️ 94205 21304
☎️ 98223 29402

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×