Breking News
पुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूकपिंपरीतील सराइताकडून पिस्तूल जप्तपुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात महिलेचे दागिने चोरीलापुण्यात बेकायदा वास्तव्य करणारे ३ बांगलादेशी ताब्यात

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

मलबा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीची संख्या वाढवली; एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्याला वेग

marathinews24.com

पुणे – मोशी कचरा डेपो येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीभोवतालचा मोठ्या प्रमाणावर असलेला मलबा हटवून इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अधिकची यंत्रसामग्री वापरून या कामाला गती देण्यात आली असून इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

मोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज – सविस्तर बातमी

सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. शिवाय, इमारतीच्या बाजूचा मलबा हटविण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरचा वापर केला जात आहे. इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या जीविताची दक्षता घेऊन काळजीपूर्वक ही मोहीम हाताळली जात आहे.

घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेऊन पुढील बचावकार्याच्या रणनीतीवर चर्चा केली. अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे कसे बाहेर काढता येईल याबद्दल प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती आणि इमारतीची सद्यस्थिती याचा सर्व बाजूने विचार करून रणनीती ठरवण्यात आली आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि मशिनरी उपलब्ध ठेऊन मशिनरी कार्यरत आहेत. घटना घडून जवळपास ४५ तासांपेक्षा अधिक कालखंड झाला आहे. त्यामुळे जलद गतीने मोहीम राबवून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना तसे निर्देश दिले आहेत, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले आहेत.

इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेश करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मागील बाजूने इमारतीत प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणचा मलबा हटवून सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीत अडकलेल्या ज्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन आत अडकलेले नागरिक नेमके कोणत्या जागी अडकले आहेत त्या जागेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार बचावकार्याला गती देण्यात आली आहे, अशी माहिती एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी दिली आहे.

यादरम्यान, आज माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून दुर्घटना आणि सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती घेतली. आत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवा असे ते म्हणाले. तसेच इमारतीत अडकलेल्या नातेवाईकांशी घटनास्थळी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे यांनी घटनास्थळी पाहणी करून साधला इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद

आज महापौर रवि लांडगे यांनी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. सध्या सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती देत, सर्व यंत्रणा समन्वयाने आणि अत्यंत दक्षतेने कार्यरत असून अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×