Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

मोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

मोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

‘प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे; प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत, धीर सोडू नका’ – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

marathinews24.com

पिंपरी – मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून इमारतीत अडकलेल्या व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी यंत्रणांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत धीर धरा, यामध्ये निश्चितपणे अडकलेल्या व्यक्ती सुखरुपपणे बाहेर येतील असा दिलासा देखील नातेवाईकांना त्यांनी दिला.

पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची व्यापक मोहीम – सविस्तर बातमी

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणा पूर्ण क्षमतेने आणि अत्यंत समन्वयाने बचावकार्य करत आहेत. ही वेळ अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे.

ते पुढे म्हणाले, प्रशासन संपूर्ण ताकदीने युद्धपातळीवर काम करत आहे. उपलब्ध सर्व मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक साधनांचा वापर करून शोध व बचाव मोहीम अखंडपणे सुरू आहे. तसेच प्रशासन तुमच्यासोबत आहे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी दिली जाईल असेही त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांचे नातेवाईक थांबलेले आहेत. त्यांच्या भोजन, निवास आणि इतर सर्व आवश्यक सुविधा त्यांना पुरवा असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अँटनी अँड लारा कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले.

दरम्यान, एनडीआरएफचे सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी बचावकार्याची तांत्रिक माहिती नातेवाईकांना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×