Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

आई- बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे केला खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

आरोपीला पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – आई-बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे एकाने तरूणाच्या डोक्यात बांबूने मारहाण करून त्याचा खून केला आहे. ही घटना १४ फेबु्रवारीला दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मशाक गाजीबक्श विजापुरे (वय ४३, रा. लक्ष्मीनगर,येरवडा ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश वसंत शिंदे (वय ३४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला पोलिसांनी अटक केली आहे.

भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशाक आणि आरोपी गणेश लक्ष्मीनगर परिसरात राहायला होते. दोघेही एकमेकांच्या ओळखीतले होते. काही दिवसांपुर्वी मशाकने गणेशला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली होती. त्याच रागातून गणेशने १४ फेबु्रवारीला मशाकला गाठले. त्याला बांबूने बेदम मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले होते. त्यानंतर मशाकला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×