टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – किरकोळ कारणावरुन मोटार चालक डाॅक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील काळेपडळ भागात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यश जावळे, आल्हाट, अलकुंटे, तसेच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डाॅ. आवेश नासीर खान (वय ३५, रा. एमरल्ड काऊंटी, कोंढवा) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाविद्यालयाच्या वसतीगृहासमोर विद्यार्थ्यांना मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. खान हे हडपसरमधील उंड्री परिसरातील पेट्रोल पंपावर निघाले हाेते. त्या वेळी आरोपी दुचाकीवरुन पेट्रोल पंपाजवळ आले. आरोपींनी दुचाकी आडवी लावून मोटार थांबविली. ‘मोटार जोरात का चालवितो?’, अशी विचारणा करुन आरोपींनी डाॅ. खान यांना शिवीगाळ केली. रस्त्यात पडलेला दगड त्यांना फेकून मारला. आरोपींनी त्यांच्या हातातील कठीण वस्तुने त्यांना मारहाण केली. घाबरलेल्या डाॅ. खान यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गायत्री बैरागी तपास करत आहेत.





















