Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

महाविद्यालयाच्या वसतीगृहासमोर विद्यार्थ्यांना मारहाण

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील विमाननगर भागातील महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर थांबलेल्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत राकेश कैलास घरडे (वय ५२, रा. बलवार आळी, गुरुवार पेठ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ओंकार सतीश घाडगे (वय १९, रा. जयजवाननगर, येरवडा), रूबेन रिचर्ड कदम (वय २०, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश घरडे हे विमाननगर भागातील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात पर्यवेक्षक आहेत. १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वसतिगृहातील दोन विद्यार्थी जेवण केल्यानंतर शतपावली करत होते. त्या वेळी आरोपींनी विद्यार्थ्यांना अडवले. ‘इंग्लिशमध्ये शिवीगाळ का केली?’ अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. सिमेंटचा गट्टू त्यांना फेकून मारला. त्यानंतर आरोपी महाविद्यालयाच्या वसतिगृहात शिरले. वसतिगृहात दहशत माजवून विद्यार्थ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद घरडे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत.

पंक्चर काढणाऱ्याला मारहाण

पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अब्दुल वली मोहम्मद खान (वय ३७, रा. भागोदयनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आयुष बिहारीलाल सिंग, शिवसागर चौधरी, सोनू यादव यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांचे कोंढव्यातील संत गाडगेमहाराज शाळेजवळ पंक्चर दुकान आहे. आरोपी पंक्चर दुकानात शिरले. किरकोळ कारणावरुन खान यांना शिवीगाळ करुन कठीण वस्तू त्यांच्या डोक्यात मारली. सहायक पोलीस निरीक्षक डोके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×