Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव

marathinews24.com

पुणे – संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मेधा कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्रातून भाजपचे हेमंत सावरा, स्मिता वाघ, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे व नरेश मस्के यांचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल रवर्षी खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्कारांचे यंदा १६ वे वर्ष होते.

‘जनक’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या १९ दिवसांत पूर्ण! – सविस्तर बातमी

राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय व लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली. सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. कुलकर्णी यांना सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झाला असून, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

प्रा. कुलकर्णी यांनी रेल्वे, महिला सुरक्षा, आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, कॉर्पोरेट जिहादच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. विशेष सत्रात, झिरो अवर, प्रश्नोत्तरे व विविध विषयांवरील चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी महिला सुरक्षा, विमा सुरक्षा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, आधार प्रमाणीकरण, आरटीई प्रवेश प्रक्रिया, शेतजमिनी याबाबत लक्षवेधी मांडल्या.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर होणे आनंदाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे.

लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते. जनतेच्या आशीर्वादाची ही पोचपावती आहे. यापुढेही लोकहितासाठी परखडपणे भूमिका मांडत राहील.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×