Breking News
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाके

मुंबईचा जीएसटी विभागातील अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात

अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मुंबईतील वस्तू आणि सेवाकर विभागातील (जीएसटी) उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत ४३ वर्षीय अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिला तसेच साथीदाराविरुद्ध खंडणी, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात गावठी दारूविक्रीचा पर्दापाश, ४२० लीटर साठा जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अधिकारी नवी मुंबईतील बेलापूर येथे राहायला आहेत. आरोपी महिला नागपूरमध्ये राहायला आहेत. २०२३ मध्ये जीएसटीतील अधिकाऱ्याची महिलेची विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांना विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. महिलेने त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे मागण्यास सुरुवात केली. वैद्यकीय उपचार, तसेच बँकेचे कर्ज, तारण ठेवलेले सोने सोडविणे अशी कारणे सांगण्यात आली.

तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी महिलेकडे विचारणा केली, तेव्हा महिलेसह साथीदारांनी त्यांना बलात्काराची फिर्याद पोलिसांकडे दिली जाईल. आयुष्यभर कारागृहात राहावे लागेल, अशी धमकी दिली.

अधिकाऱ्याने आरोपी महिलेला वेळोवेळी ४२ लाख ८७ हजार रुपये दिले होते. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पुन्हा सात लाख रुपये मागण्यात आले. आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने नुकतीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×