Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग वाहतूकीस बंद

ताम्हिणी घाटातील रस्ता खचला

marathinews24.com

पुणे – संततधार पावसामुळे खंडाळा घाट, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी कोसळण्याच्या धोका असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला. दोन्ही बाजूने या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुण्याहून ताम्हिणी घाटमार्गे माणगावकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ताम्हिणी घाटातील रस्ता खचल्याने पौड ते माणगाव दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट: शहर व ग्रामीणमधील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी – सविस्तर बातमी

‘पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने रेड ॲलर्ट जाहीर केला आहे. पुणे शहर, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावरुन पुणे-मुंबईकडून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आाहे. घाट क्षेत्र, तसेच द्रुतगती मार्गावर पावसामुळे डोंगर कपारीतील दगड सैल झाल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्ग, तसेच जुना महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद राहणार आहे’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली. घाट क्षेत्र, तसेच द्रुतगती मार्गावर महामार्ग पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोणावळा, मावळात पूरस्थिती

पुणे- लोणावळा, मावळ तालुक्यात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. लोणावळा, मावळ तालुक्यात २४ तासात ६२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ओढ्यांवरील पूल बंद करण्यात आली. नागरिकांनी नदीपात्राच्या बाजूला जाऊ नये. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा बंद करण्यात आली. कामाचा पहिला दिवस असल्याने अनेकांनी नेहमीप्रमाणे पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी गर्दी केली होती.

रेल्वे गाड्या, तसेच एसटी सेवा बंद केल्याने नोकरदारांची गैरसोय झाली. पवन मावळातील ओझर्डे गावातील रस्ता वाहून गेला. लोणावळ्यातील पांगोळी स्मशानभूमीजवळ दरड कोसळली. खंडाळ्यातील काही भागात डोेंगर कपारातील माती वाहून आली. लोणावळा शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले. सोसायटी, तसेच घरांमध्ये पाणी शिरले. टाटा धरण पूर्णपणे भरल्याने भिंतीवरून पाणी लोणावळा शहरात शिरले आले आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने कुटुंब अडकले. प्रशासन, तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मुंबई-पुणे जुना महामार्गावर नायगाव साते येथे पाणी साचल्याने वाहने अडकून पडली. पवनानगर बाजारपेठ, तसेच वडगाव मावळ बाजारपेठेत पाणी शिरले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×