धायरीत तरुणाच्या डोक्यात बॅट मारून खून

धायरीत तरुणाच्या डोक्यात बॅट मारून खून

नांदेड सिटी पोलिसंनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वादातून तरुणाच्या डोक्यात बॅट मारून त्याचा खून करण्यात आल्याची घटना धायरीतील डीएसके विश्व रस्त्यावर घडली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसंनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला. विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. राधिका राॅयल सोसायटी, बारंगणी मळा, चव्हाण बागेजवळ, धायरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबबात विशाल याचा भाऊ प्रथमेश (वय २६) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य उमाप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याजवळ सणसवाडीत १ कोटी ७९ लाखांचे एमडी जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि विशाल हबीब यांच्यात वाद झाला होता. ११ मार्च रोजी धायरीतील डीएसके रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास आरोपीने विशालला अडवले. त्याला शिवीगाळ करुन त्याच्या डोक्यात बॅट मारली. या घटनेत विशाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या विशालला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाली.घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस निरीक्षक भोस तपास करत आहेत. दरम्यान, नांदेड सिटी परिसरातील सदनिकेत पार्थ बापू गोरे (वय २१, रा. आसावरी इमारत, नांदेड सिटी) यांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.

चेष्टा मस्करीतून फैसल फारुख खान (वय ३०, रा. कौसरबाग, कोंढवा) याचा चाकूने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना लष्कर भागातील मोदीखाना परिसरात नुकतीच घडली. खान हा वास्तू विशारद होता. या प्रकरणी अब्बास अश्रफअली सय्यद (वय २५, रा. चुडामण तालीम,भवानी पेठ), सोहेल युसुफ तांबोळी (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), अश्रफअली गफार सय्यद (वय ५५, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) यांना अटक करण्यात आली. चेष्टा मस्करीतून त्याचा १० मार्च रोजी खून करण्यात आला. शहरात गेल्या तीन दिवसात खुनाच्या दाेन घटना घडल्या आहे. गेल्या आठवड्यात हडपसर-सासवड रस्त्यावर एकाने मनोरूग्ण महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी वडकीतील एका गोदामात काम करणाऱ्या कामागाराला फुरसुंबगी पोलिसांनी अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×