एरंडवणे भागातील घटना
marathinews24.com
पुणे – रखवालदाराच्या डोक्यात गज मारुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना एरंडवणे भागात घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.अशोक तुकाराम पोटे (रा. गणेशनगर, एरंडवणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अथर्व गणेश चव्हाण (रा. गणेशनगर, एरंडवणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन नामदेव सातपुते (वय ३०, रा. हनुमाननगर, केळेवाडी, पौड रस्ता) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वार्षिक उत्सवात फटाक्यांची माळ लावण्याचा वाद; दत्तवाडीत दोन गटात हाणामारी- परस्परविरोधी गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणे भागातील ओैद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत अशोक पोटे रखवालदार आहेत. पोटे आणि आरोपी अथर्व चव्हाण यांच्यात वाद झाले होते. वादातून चव्हाणने पोटे यांच्या डोक्यात लोखंडी गज मारल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. चव्हाण कंपनीच्या आवारातून पसार झाला. पोटे गंभीर जखमी झाले. त्यांना कंपनीतील कामगारांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत.