Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

वाघोलीत तरूणावर खुनी हल्ला, आरोपी पसार

वाघोलीत तरूणावर खुनी हल्ला, आरोपी पसार

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मित्राची वाट पाहत थांबलेल्या १८ वर्षीय तरूणाला टोळक्याने लोखंडी हत्यारासह दांडक्याने मारहाण करीत खुनी हल्ला केला आहे. ही घटना १८ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास केसनंदमधील लाडोबा वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी वाघोलीत राहणार्‍या १८ वर्षीय तरूणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने ६२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण वाघोलीत राहायला असून, १८ मार्चला दुपारी तीनच्या सुमारास तो लाडोबा वस्तीजवळ मित्राची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या टोळक्याने काहीही कारण नसताना तरूणाला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याला लोखंडी हत्याराने मारहाण करीत दांडक्याने बेदम मारहाण केली. तरूणाला गंभीर जखमी केल्यानंतर टोळके पसार झाले. दरम्यान घटनेची माहिती झाल्यानंतर वाघोली पोलिसांनी धाव घेतली. आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×