Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Neelam Gorhe Ganpati Darshan : बाप्पाच्या चरणी शांतता, सलोखा अन् जनहितासाठी प्रार्थना – डॉ. नीलम गोऱ्हे

Neelam Gorhe Ganpati Darshan : बाप्पाच्या चरणी शांतता, सलोखा अन् जनहितासाठी प्रार्थना - डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सव हा उत्साहासोबतच सामाजिक सलोखा, शांतता आणि शिस्तीचा संदेश देणारा उत्सव आहे. यंदाचा गणेशोत्सव अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावा, तसेच समाजात वाढत चाललेली हिंसा थांबून प्रत्येकाच्या सन्मानाचे रक्षण व्हावे. Neelam Gorhe Ganpati Darshan तसेच, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला अधिकाधिक शक्ती मिळावी, समाजात शांतता व सलोखा नांदावा आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान जपला जावा, अशी अपेक्षा शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी गौरींचे मंगल आगमन; भक्ती आणि उत्साहाने फुलले वातावरण… – सविस्तर बातमी 

पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे (दि.१६)रोजी दर्शन घेत डॉ. गोऱ्हे यांनी विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, Neelam Gorhe Ganpati Darshan असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष तथा उत्सवप्रमुख पुनीत बालन, शिवसेना शहर संघटक आनंद गोयल, अभिनेते जितेंद्र जोशी व उपेंद्र लिमये उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×