Breking News
रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारएचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणीश्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक; संस्थानच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्यपुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीरप्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारथी कार्यालयास भेटलष्करी गणवेश शिवण्याच्या बतावणीने टेलरिंग व्यावसायिकाची फसवणूकपुण्यात गणेश पेठेत भरदिवसा घरफोडीनिलेश घायवळ टोळीतील गुंड अटकेत

नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक

२४ तासांत देशातील विविध ठिकाणी सीबीआयचे छापे

marathinees24.com

पुणे – देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अखेर पुण्यातून मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हाच प्रश्नपत्रिका फुटीचा मूळ मास्टरमाईंड असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय परीक्षा संस्थाच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने कुलकर्णी याला प्रश्नपत्रिकेपर्यंत थेट प्रवेश मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

संजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्त – सविस्तर बातमी

सीबीआयच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस कुलकर्णीने आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना गुप्तपणे एकत्र केले. पुण्यातील स्वतःच्या निवासस्थानी त्याने विशेष मार्गदर्शन वर्ग घेत प्रश्न, पर्याय आणि अचूक उत्तरे विद्यार्थ्यांना सांगितल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी वहीत उतरवून घेतलेले हे प्रश्न ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सीबीआयने गेल्या २४ तासांत देशभरातील विविध ठिकाणी धाडसत्र राबवत महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. या सर्व साहित्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित आरोपींना दिल्लीला हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळून ‘विशेष क्लासेस’च्या माध्यमातून प्रश्नसंच पुरविणारे दलाल, मध्यस्थ आणि शिक्षण क्षेत्रातील काही संशयितांचे जाळेही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि सर्वंकष तपास सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×