पीडित मुलीच्या वडिलांनी मुंढवा पोलीस ठाण्यात दिली फिर्याद
marathinews24.com
पुणे – शेजारी राहणाऱ्याने साडेसात वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सायबर चोरट्यांकडून महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेला पीडित मुलीचा शेजारी आहे. ११ मे रोजी त्याने मुलीला खेळायला नेण्याच्या बहाण्याने सोसायटीतील गच्चीवर नेले. त्यानंतर त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शेजाऱ्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.