Breking News
नवीन कामगार कायद्याबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमउत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे- रोहित टिळकपुण्यात दहीहंडी पाहणे महागात, तरुणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरीलाएसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, मित्र जखमीगौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणातील सरकारी पक्षाची अनुपस्थिती गंभीर : डॉ. नीलम गोऱ्हेमहाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला बेड्याशाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पाशंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने रसिक मंत्रमुग्धकात्रजमधील मंदिरातून ५ लाखांचे दागिने चोरीससून रुग्णालयाजवळ तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले

नवीन कामगार कायद्याबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

नवीन कामगार कायद्याबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

नवीन कामगार संहितेतील हक्क व तरतुदींबाबत मार्गदर्शन; मोफत कायदेविषयक सेवांचीही दिली माहिती

marathinews24.com

पुणे – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि Aajivika Bureau यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांसाठी नवीन कामगार संहितेबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती आर. देशपांडे तसेच संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग एस. पी. नार्वेकर उपस्थित होत्या.

उत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे- रोहित टिळक – सविस्तर बातमी 

यावेळी एस. पी. नार्वेकर यांनी नवीन कामगार संहितेतील तरतुदी, कामगारांचे हक्क व कायदेशीर संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. सचिव रेवती आर. देशपांडे यांनी कामगारांसाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध मोफत कायदेविषयक सेवा, मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमास कामगार व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक करणे व विधी सेवा सुविधांपर्यंत त्यांचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करणे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×