पेहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरण
Marathinews24.com
पुणे – जम्मू काश्मीरमधील पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्य पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक (एनआयए) शुक्रवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाले होते. पुण्यातील दोन पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर पथकाने संतोष जगदाळे यांच्या कर्वेनगरमधील घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश – सविस्तर बातमी
दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात देशातील विविध भागातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांना मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला झाला त्यावेळी दोघांचे कुटुंबातील सदस्य घटनास्थळी हजर होते. दिवंगत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरीही हल्ल्यावेळी तेथे उपस्थित होती. त्यांच्या समोर जगदाळे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या.
आसावरी यांनी पुण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या वडीलांना कशा पध्दतीने मारले याची आपबिती सांगितली होती. दरम्यान दहशतवाद्यांच्या शोधासाठी देशातील सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यातच गुन्ह्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. जगदाळे कुटूंबियांकडून हल्ल्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा एनआयएच्या पथकाने प्रयत्न केल्याचे सुत्रांनी सांगितले.