Breking News
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दापाशकपडे विक्रेत्याची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूकभीमनगरच्या रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी घरे द्या- समाजसेविका मेधा पाटकर यांची  मागणीगाडीचा कट लागल्याचा वाद गोळीबारावर पोहचलापुणे जिल्ह्यात ९ जूनला ‘महसूल लोक अदालतीचे आयोजनपुण्यातील पोर्शे कार अपघाताला झाले एक वर्ष, अजूनही ८ आरोपी कारागृहातचपुण्यातील वाहतूक पोलिसांमध्ये बदल घडतोयसहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवारट्रेकिंगदरम्यान निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधनजिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न; बियाणे, खते, निविष्ठांच्या पुरवठ्याबाबत आढावा

पुण्यातील पोर्शे कार अपघाताला झाले एक वर्ष, अजूनही ८ आरोपी कारागृहातच

दोघा होतकरू अभियंत्याचा गेला होता जीव

marathinews24.com

पुणे – शहरातील बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने नशेच्या धुंदीत बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघा होतकरू अभियंत्याचा जीव घेतला. मात्र, अपघात करणारा आपला मुलगा नसल्याचा कट रचून त्याला बाहेर काढण्यासाठी ड्रायव्हरला पुढे करण्यात आले. अपघात प्रकरणात दाबण्यसासाठी स्थानिक पोलीस, आमदाराचा हस्तक्षेप, कोट्यावधी रूपयांची बोली लावण्यात आली. पंरतु, नागरिकांचा विरोध, व्हायरल झालेले व्हिडिओ-फोटोमुळे पोलिसांना भूमिका बदलावी लागली. अखेर कुबेर बिल्डरच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला. तर त्याच्या वडिलांसह हॉटेल-पब मालकांनाही अटक केली होती. याप्रकरणाला आज वर्षपूर्ती झाली असून, आजही ८ आरोपी कारागृहात आहेत. संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर या अपघाताची चर्चा झाली आहे. या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत असून, त्यापार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला आहे.

पुण्यातील वाहतूक पोलिसांमध्ये बदल घडतोय; सॉफ्ट स्कीलचे धडे आले कामी, वादविवाद झाले कमी – सविस्तर बातमी 

मित्रांसोबत नाईट पार्टीसाठी बाहेर पडलेल्या आयटी इंजिनिअर दुचाकीस्वार तरूण -तरूणीला बेदरकारपणे अलीशान पोर्शे कार अल्पवयीन चाकाने चिरडून ठार केल्याची घटना रविवारी (दि. १८ मे २०२४ पहाटेच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात घडली. अपघात घडवून आणलेला अल्पवयीन बड्या बिल्डरचा लाडला असल्याची माहिती येरवडा पोलिसांसह स्थानिक आमदाराला मिळाली. त्यानंतर अल्पवयीन आरोपीचे लाड पुरविले. पोलीस ठाण्यात मुलाचे नातेवाईक त्याला खाण्यासाठी पिझ्झा-बर्गर दिला होता. पोलिसांनी त्याला बसायला खुर्चीही दिली. तोपर्यंत स्थानिक आमदाराने पहाटेपासूनच याप्रकरणात लक्ष देत मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. थेट आमदार पोलीस ठाण्यात आल्यामुळे येरवडा पोलिसांवर दबाव वाढला. काहीही झाले तरी, अल्पवयीनाविरूद्ध गुन्हा दाखला होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली.

अल्पवयीनाने दारूच्या नशेत १८० ते २०० किलोमीटर वेगाने मोटार चालवून दोघांना फुटबॉलसारखे उडवून लावले होते. घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आरोपीला स्थानिक तरूणांनी केलेली मारहाण, व्हायरल झालेले व्हिडिओनंतही पोलिसांनी तरूण-तरूणीच्या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतल्यानंतरही त्याच्याविरूद्ध कारवाईऐवजी पोलीस गुन्ह्यातील तपास दुसरीकडे भटकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. दरम्यान, माध्यमांचा वाढलेला दबाव, सोशल मीडिया, नागरिकांच्या संतापामुळे येरवडा पोलिसांनी भूमिका बदलली. अल्पवयीनाविरूद्ध गुन्हा दाखल करून बालन्याय मंडळापुढे हजर केले. मात्र, मंडळानेही त्याला निबंध लिहण्याची शिक्षा, चांगले वागण्याचे धडे देउन अवघ्या काही तासात जामीन मंजूर केला. त्याचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या पुर्नअर्जानंतर आरोपीला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले.

मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला मोटार चालविण्यास दिल्याप्रकरणी बिल्डर विशाल अगरवालला पोलिसांनी अटक केले. तर वयाची खातरजमा न करता दारू विकल्याप्रकरणी पब मालकासह व्यवस्थापकानांही गजाआड करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर बिल्डरने मुलाची सुटका करण्यासाठी गाडी चालकाला गोवण्याचा प्रयत्न केला. अपघातावेळी मुलाऐवजी गाडी ड्रायव्हर चालवित असल्याचे भासविण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मात्र, सीसीटीव्ही आणि घराच्या रक्षणासाठी असलेल्या गार्डच्या नोंदवहीत अल्पवयीन मुलाने पोर्शे कार नेल्याचे उघडकीस आले. तर पोलिसांकडून मुद्दामहून आरोपीला फायदा होण्यासाठी रक्तचाचणीला उशीर केला. पैशांचा बेसुमार वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात पैसा बोलला पण तो चाललाच नाही, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.

अग्रवाल कुटूंबिय आणखीनच गोत्यात

अल्पवयीन मुलाने अपघात केल्याप्रकरणात दिवसेंदिवस अगरवाल कुटूंबिय अडचणीत सापडत आहे. मुलाला वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न वडिल विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल, डॉक्टर अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरनोल यांच्या अंगलत आले आहे. दरम्यान, ड्रायव्हरला धमकाल्याच्या प्रकरणातही पुणे पोलिस विशाल अग्रवाल याचा ताबा मागणार आहे. तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेला ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी त्याच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले आहे.

पुण्यात रात्री ११ ते १ कालावधीत सर्वाधिक अपघात

पुण्यात २०२२ मध्ये झालेल्या अपघातात ३२७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ७५ जणांचा मृत्यू हा रात्री ११ ते १ च्या सुमारा झाला आहे. विशेषतः मध्यरात्रीच्या वेळी रस्ता रिकामा असल्याने चालकांकडून बेशिस्तपणे वाहने दामटली जातात. उलट्या दिशेने प्रवास करीत अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अनेक अपघात घडून निष्पाप नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. रस्ता मोकळा दिसल्यामुळे चालकांकडून वाहनांचा वेग वाढविला जातो. त्यामुळे अपघात झाल्याचे पुणे पोलिसांच्या २०२२ च्या रोड क्रश डेटा विश्लेषणातून उघडकीस आले आहे.

अल्पवयीनांविरुद्ध दंडात्मक कारवाई

वाहतुकींचे नियम मोडल्याप्रकरणी २०२३ वर्षात अल्पवयीन मुलांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २ लाख ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर २०२४ मध्ये चार महिन्यात २६ अल्पवयीन मुला-मुलींवर दंडात्मक कारवाई करीत १ लाख २० हजारांची वसुली केली आहे. शहरात १९ हून अधिक ब्लॅक स्पॉटवर वारंवार अपघात होत असल्याचे वाहतुक विभागान केलेल्या स्ार्वेक्षणात आढळून आले आहे. वाहतुक विभागाकडून या दृष्टीने मार्ग काढण्याचा प्रयत्नांना अपेक्षित यश आले नाही.

पोलीस निरीक्षक, एपीआय जबाबदार

कल्याणीनगर अपघातप्रकरणी वरिष्ठांना वेळेत माहिती न देणे आणि तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित केलेल्या दोघांची नावे आहेत. अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्याची घटना रविवारी (दि. १९) मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये घडली. अपघाताची माहिती वरिष्ठांना न दिल्याबद्दल आणि या घटनेचा गांभीर्यपूर्ण तपास न केल्याचा ठपका ठेवत येरवडा ठाण्यातील निरीक्षकासह सहायक निरीक्षकाला निलंबित केले.

पुणे पोलिसांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

भयंकर अपघात घडूनही प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेल्या अधिकार्‍यांनी वरिष्ठांसह कंट्रोल रूमला माहिती दिली नाही. त्यामुळे रात्रपाळीच्या अधिकार्‍यांना याबाबात काहीच समजले नाही, असा निष्कर्ष काढून चौकशी केली आहे. प्रत्यक्षात मात्र, पुणे पोलिसांना कोणत्याही घटनेचे गांभीर्य नसल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. विशेषतः मध्यवर्ती सदाशिव पेठेत कोयत्याधारी तरूणाने महाविद्यालयीन तरूणीवर केलेल्या जीवघेण्या हल्लावेळी चौकीत पोलीस नसणे, अपघातात दोघा अभियंत्याचा जीव गेल्यानंतरही किरकोळ घटनेप्रमाणे वागणे, अशा अनागोंदी कारभारामुळे पुणे पोलिसांची नागरिकांमधील इभ्रत ढासळली आहे.

सावरायला आले अन स्वतः शेकून गेले

अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्यामुळे पुणेकरांसह राज्यभरात प्रचंड संतापाची लाट होती. पुणे पोलिसांकडून पहिल्यांदा आरोपीला मदत करण्याच्या भूमिकेमुळे चीड निर्माण झाली होती. दस्तुरखुद्द तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येउन पोलिसांना क्लीन चीट दिली. मात्र, सोशल मीडियासह नागरिकांकडून आणखीनच राग व्यक्त केला होता. त्यामुळे फडणवीस सावरायला आले अन स्वतः शेकून गेल्याचे बोलले गेले.

कल्याणीनगरमध्ये धनाढ्य बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करून दुचास्वार दोघांना धडक देउन त्यांचा बळी घेतला आहे. याप्रकरणात पुणे पोलिस, आमदार, बाल हक्क बोर्ड, आरोपीला पिझ्झा-बर्गरची पार्टी, नागरिकांच्या रेट्यामुळे पोलिसांनी कलमात केलेला बदलामुळे अपघात प्रकरण पुर्णतःढवळून निघाले होते. अपघात प्रकरणाची व्याप्ती पोलिसांवर शेकत असल्याचे लक्षात येताच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे पुण्यात धाव घेतली.

बाल न्याय मंडळावर संशय

तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल न्याय मंडळाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. त्यामुळे ऐन आचार संहितेत बोर्डाच्या निर्णयावर बोलण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांवर शेकलेले प्रकरण बाल न्याय मंडळासह इतरांच्या माथी मारून फडणवीस पुणे पोलिसांसह पोलीस आयुक्तांना का वाचवू पाहत आहेत, असा प्रश्न नागरिकांनी विचारला होता.

संपूर्ण अगरवाल कुटूंबीय अडकले प्रकरणात

मद्यपान करून बेदरकारपणे अलिशान मोटार चालवून अल्पवयीनाने तरूणीसह दोघांना चिरडल्याप्रकरणी पुणे पोलिसांना संंबंधिताच्या वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत त्याला मद्य पुरविणारा हॉटेल मालकांसह व्यवस्थापकाविरूद्धही येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद भुतडा (रा. येरवडा) , सचिन काटकर , संदीप सांगळे जयेश बोनकर आणि विशाल अगरवाल (रा. वडगाव शेरी ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एपीआय विश्वनाथ तोडकरी यांनी फिर्याद दिली आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

हायप्रोफाईल पोर्शे कार अल्पवयीन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी १८ मे २०२४ रोजी पहाटे तीनच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये घडली होती. यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा वेदांतने मद्यपान करून वाहन चालविल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघात घडण्यापूर्वी आरोपीने मेरियट सुट्समधील ब्लॅक आणि कोझी रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत मद्यपार्टी केली होती. दरम्यान, मोटार चालविण्याचे प्रशिक्षण घेतले नसतानाही आणि अल्पवयीन असतानाही मुलाचे वडील बांधकाम व्यावासायिक विशाल अगरवाल यांनी गाडी चालविण्यास दिली होती. तर वयाची खातरजमा न करता हॉटेल व्यावसायिकांनी त्याला मद्य पिण्यासाठी उपलब्ध केले.

बेफिकीर बाप अन बेशिस्त हॉटेल व्यावसायिक

अल्पवयीन मुलगा मद्य प्राशन करतो हे वडिलांना माहिती असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. तरीही रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल कोझिचे मालक प्रल्हाद भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर यांनी त्याला मद्य पिण्यासाठी उपलब्ध केले. दुसरे हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे आणि बार काउंटर मॅनेजर जयेश बोनकर यांनाही अल्पवयीन आरोपीला जेवण आणि मद्य आणून दिले. तर मुलाकडे वाहन परवाना नसतानाही वडिल विशाल अगरवाल यांनी त्याला अलिशान मोटार चालविण्यासाठी ताब्यात दिली. याप्रकरणी संबंधितांविरूद्ध मोटर वाहन अधिनियम १९८८ नुसार ३, ५, १९९ अ, अल्पवयीन न्याय कायद्यानुसार ७७, ७५, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चार्जशिट दाखल

मेरीयट सुट्स पंचतारांकित हॉटेलच्या ब्लॅक पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विकणे महागात पडले आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंचशील इन्स्पाट्रक्चरचे मालक सागर चोरडिया यांच्या विरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. याशिवाय कोझी या बारचे मालक प्रल्हाद भुतडा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, अशी माहिती, माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय मुलावर भादवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अकिब रमजान मुल्ला (वय २४, रा. चंदननगर, मुळ रा. लोकमान्य नगर, आसरा चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top