Breking News
पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

राज्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी लाखावर अर्ज

राज्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी लाखावर अर्ज

नगराध्यक्ष पदासाठी ८ हजार ३३४ उमेदवारी अर्ज दाखल

marathinews24.com

मुंबई – राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज झाली. सदस्यपदासाठी तब्बल १ लाख ७७८ अर्ज दाखल झाल्यासून, नगराध्यक्षपदासाठी ८ हजार ३३४ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या – सविस्तर बातमी 

तब्बल पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून, पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. आज तेथे उमेदवारी अर्जाची छाननी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदस्यपदासाठी १ लाख ७७८ अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ८ हजार ३३४ अर्ज दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सदस्यपदासाठी सर्वाधिक म्हणजे ११ हजार ८११ अर्ज दाखल झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक अर्ज !

छत्रपती संभाजीनगर विभागात बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून सदस्यपदासाठी सर्वाधिक ११ हजार ८११ अर्ज दाखल झाले, तर अध्यक्षपदासाठी ११९२ अर्ज दाखल झाले.पुणे विभागात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून सदस्यपदासाठी ११ हजार ०४४, तर अध्यक्षपदासाठी ८२३ अर्ज दाखल झाले आहेत.

विदर्भातील अमरावती विभागात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधून सदस्यपदासाठी ८४९२, तर अध्यक्षपदासाठी ६९३ अर्ज दाखल झाले.नागपूर विभागात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातून सदस्यपदासाठी ७१२५, तर अध्यक्षपदासाठी ५७७ अर्ज दाखल झाले आहेत.

कोकण विभागात पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात सदस्यपदासाठी ३०१०, तर अध्यक्षपदासाठी २०० अर्ज दाखल झाले. नाशिक विभागात अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातून सदस्यपदासाठी ९५९०, तर अध्यक्षपदासाठी ७१३ अर्ज दाखल झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×