प्रवाशाच्या पोटाला चाकू लावला, दीड लाखांचा आयफोन चोरला

प्रवाशावर चाकूचा धाक दाखवत, दीड लाखांचा आयफोन लंपास

Marathinews24.com

पुणे – शहरातील  वाकडेवाडी एसटी बस स्थानकाबाहेर थांबलेल्या  प्रवासी तरुणाच्या पोटाला चोरट्याने चाकू लावून त्याचा आयफोन चोरून नेला आहे.   राहुल जालींदर कासार ( वय २५, रा.खडकी) याने खडकी पोलीस ठाण्यता  तक्रार दिली आहे. त्यानुसार  दोन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुण्यातील कोथरूडमधील तरुणाची ३९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल हा  कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.  शनिवारी सायंकाळी तो अहिल्यानगरला जाण्यासाठी वाकडेवाडी बस स्थानकात गेला होता. बाहेरील स्टॉलवरुन खाद्य पदार्थ घेतल्यावर कॉल करण्यासाठी त्याने महागडा मोबाईल बाहेर काढला होता. त्यावेळी दोन व्यक्ती त्याच्या जवळ आल्या, एकाने खांद्यावर हात ठेवला तर दुसर्‍याने पोटाला धारदार चाकू लावला. ‘इधरच मार दुँगा, पोलिसमे गया तो जिंदा नही छोडेंगे ’ असे म्हणत चोरट्यांनी राहूलचा  दिड लाखाचा आयफोन काढून घेतला. घारबलेल्या तरुणाने तसेच अहिल्यानगर गाठले. तेथे मावशीने धीर दिल्यावर त्याने पुण्यात येऊन तक्रार दाखल केली.  

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top