पुण्यातील पर्यटन व्यावसायिकांकडून मृतांना श्रद्धांजली…
marathinews24.com
पुणे – जम्मूतील पहलगाममध्ये दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील पर्यटन व्यावसायिकांकडून तीव्र निषेध करीत कँडल मार्च पार पाडला. पर्यटन हा केवळ व्यवसाय नसून, तो देशाच्या आत्म्याशी जोडलेला संवाद आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील संपूर्ण पर्यटन व्यावसायिकांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरात एकत्र येत रॅली काढली होती. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. पुण्यातील सर्व ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनने शांततेच्या कॅंडल मार्चमध्ये सहभाग घेतला होता.
जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या ६५७ पर्यटकांचा जिल्हा आपत्ती नियंत्रण प्रक्षेची संपर्क – सविस्तर बातमी
देश प्रथम असून पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यांची काळजी नेहमीच प्राधान्याने घेतली जाणे आवश्यक आहे. हल्ला करून काश्मीरमधील शांतता व पर्यटन रोखण्याचा दहशतवादी संघटनाचा डाव होता. पण अशा भ्याड हल्ल्यामुळे आपण थांबलो, तर ती त्यांच्या विकृत वाढत जाऊ शकते. हे आपण कधीही होऊ देणार नाही. आता आपणच जबाबदारी घेत दहशतीला पर्यटनाच्या रूपाने उत्तम देणे गरजेचे आहे. त्यामुळे दुप्पट पर्यटक काश्मीरला पाठवू, हेच आमचं उत्तर, असेल असा विश्वास यावेळी संघटनेने व्यक्त केला.
देशवासीयांसोबत असलेली बांधिलकी,काश्मीरप्रती असलेले प्रेम, दृढ निश्चयासाठी आपण कायमस्वरूपी एकच असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. काश्मीर आपलच असून, कायमच आपलच राहणार आहे. कॅंडल मार्चमध्ये पर्यटन व्यावसायिक सक्रिय असलेले निलेश भन्साळी, दीपक पुजारी, अमित पंडित, अनिकेत केकर, विवेक गोळे, अखिलेश जोशी, विजय मंडलिक, मेहबूब शेख, समीर कुलकर्णी, जी. कृष्णा, संतोष खवले, दुष्यंत देसाई, शशांक कुलकर्णी, अमित बोराडे, मंदार सात्रे, आणि प्रसाद सेठ. मनीष केळकर, श्रीकांत जगताप,प्रमोद बिडकर यांनी सहभाग घेतला होता.
आम्ही एकत्र आहोत, संघटनेने दिला संदेश
दहशतवादी हल्ल्यानंतरही आम्ही निर्धाराने उभे आहोत. आम्ही शांततेसाठी लढतोय, अशांततेच्या विरोधात असल्याचे मोर्चातून दाखवून दिले. यावेळी सर्वांनी मेणबत्त्यांच्या उजेडात मौन पाळत हल्ल्यात बळी गेलेल्या निरपराध पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच्या कुटुंबीयांच्या सोबत असल्याची भावनिक एकजूटता दाखवली.