Breking News
एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूककात्रज चौकातील वाहतूक पूर्ववतशिवाजीनगर वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्यासराईत शिवम आंदेकरविरुद्ध खंडणीचा गुन्हापुण्यात मच्छी विक्रेत्याकडून तब्बल ४८ लाखांची उकळली खंडणीपोलीस अमलदारानेच उकळली 28 हजारांची खंडणी, सेवेतून निलंबितकामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिकारांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवरउद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारनवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कात्रजमध्ये रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला उडविले, टेम्पो चालक पसार

अज्ञात टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे– भरधाव टेम्पो चालकाने रस्ता ओलांडणार्‍या तरूणाला धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कात्रज परिसरातील सृष्टी लॉजसमोर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगा प्रसाद (वय ३९ रा. आंबेगाव बुद्रूक) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्ड करून ठेवला अन पत्नीचा गळा घोटून केली आत्महत्या – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा प्रसाद एकाठिकाणी काम आटोपून रस्त्याने घरी जात होता. १३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कात्रज परिसरातील सृष्टी लॉजसमोर तो रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या गंगा प्रसाद याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर जखमी गंगा प्रसादला मदत न करता पसार झाला. त्याच्या शोधासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून, वाहन क्रमांकानुसार लवकरच आरोपी चालकाला ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top