रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावून चोर पसार- सदाशिव पेठेतील घटना
Marathinews24.com
पुणे – भरदिवसा पादचारी तरुणाचा १ लाख रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मध्यवर्ती सदाशिव पेठेत घडली. याप्रकरणी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी तरुण बुधवारी (२ एप्रिल) दुपारी अडीचच्या सुमारास सदाशिव पेठेतील उद्यानप्रसाद मंगल कार्यालयाजवळून दुपारी अडीचच्या सुमारास जात होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील १ लाख रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. तरुणाने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांंचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत. दरम्यान, नाना पेठेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली होती.