पादचारी जेष्ठाची सोन्याची चैन हिसकावली

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात

विश्रांतवाडीतील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९० हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना १४ ऑक्टोबरला रात्री सव्वा आठच्या सुमारास विश्रांतवाडीतील टिंगरेनगरातील दुर्गामाता मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी ८३ वर्षीय जेष्ठाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्यापाऱ्याला धमकावून ४५ हजारांची रोकड लुटली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक विश्रांतवाडीत राहायला असून, १४ ऑक्टोबरला रात्री सव्वा आठच्या सुमारास ते टिंगरेनगरातून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्याने त्यांना गाठले. त्यांच्या गळ्यातील ९० हजारांची सोन्याची चैन हिसकावून दुचाकीस्वार सुसाट वेगाने पसार झाला. जेष्ठाने आरडाओरड करेपर्यंत चोरटा दिसेनासा झाला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजमधील तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. पोलीस अमलदार गाडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×