Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

कर्वे रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – पादचारी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील कोथरूड, भवानी पेठ, शिवणे, हडपसरमध्ये घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण अहिल्यानगरमधील लोणी प्रवरा गावचा रहिवासी आहे. तरुणाची आई कामानिमित्त पुण्यात आली होती. १ जानेवारी रोजी तक्रारदार तरुणाची आई कर्वे रस्त्यावरुन निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला

पीएमपी प्रवासी महिलेकडील सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नारायण पेठ परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला शनिवार पेठेत राहायला आहेत. त्या सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास वारजे ते पुणे स्टेशन या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासा दरम्यान त्यांचे ३५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविले. केळकर रस्त्यावरील बस थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा मंगळसूत्र चाेरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×