१ जूनला वृक्षाथॉन मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – प्रत्येकाच्या आयुष्यात शरीरस्वास्थ खूप महत्वाचे असून, त्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. त्याच अनुषंगाने येत्या १ जूनला आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षाथॉन मॅरेथॉमध्ये अवश्य सहभाग घेण्याचे आवाहन पुणे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले. पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, अपर आयुक्त अरविंद चावरिया, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, अपर आयुक्त मनोज पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, तुषार चव्हाण, दीपक पवार उपस्थित होते.
गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदे – सविस्तर बातमी
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्ताने पुणे पोलीस, वन विभाग आणि वृक्षाथॉन फाउंडेशनच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. निसर्ग संवर्धनासह वृक्ष लागवडीबाबत जनजागृती व्हावी, याच दृष्टीकोनातून १ जूनला मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे. ३ किलोमीटर, पाच, दहा आणि २१ किलोमीटर प्रकारात मॅरेथॉन संपन्न होणार आहे. विजेत्या स्पर्धकांसाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक दुचाकी, इलेक्ट्रॉनिक सायकल अशी तब्बल २५ लाखांवर बक्षीसे वितरित केली जाणार आहेत. मॅरेथॉनमध्ये पुणे पोलिसांसह वनविभागातील कर्मचारी-अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागासाठी वृक्षाथॉन डॉट कॉम लिंकवर भेट देउन नोंदणी करावी. जास्तीत जास्त नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होउन वृक्ष संवर्धन जनजागृतीसाठी प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण म्हणाले, वृक्षसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी आयोजित मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा. जेणेकरून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे महत्व आणखीन अधोरेखित होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल ३ हजार हेक्टर वनक्षेत्र असून, वृक्षांच्या संरक्षणासाठी आम्ही वेळोवेळी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यभरातून नागरिकांनी १ जूनला आयोजित वृक्षाथॉन मॅरेथॉनमध्ये सहभागी होउन पर्यावरण जतनाचा संकल्प करावा. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण जपणूक काळाची गरज असून, त्यासाठी आपण सर्वांनीच प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.