पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पार पडली पारदर्शक सोडत प्रक्रिया

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झाली. राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियंत्रणाखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली.

पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक – सविस्तर बातमी 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, यांच्यासह महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,सह आयुक्त मनोज लोणकर, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सुरूवातीला राज्य निवडणूक आयोगाची आरक्षण सोडतीसाठी असणारी नियमावली सांगितली. त्यानंतर निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया चार टप्प्यात झाली.

यामध्ये पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत काढण्यात आली.

आरक्षण सोडत प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग सोडत प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरिता प्रक्रिया पूर्ण करून प्रभागनिहाय आरक्षित जागा जाहीर करण्यात आल्या. आरक्षण कामकाजाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी तर सूत्रसंचालन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

सोडतीनुसार आरक्षित झालेल्या जागांचा तपशील

एकूण जागांचा तपशील
अनुसूचित जातीसाठी एकूण जागा 20 त्यापैकी 10 महिलांसाठी
अनुसूचित जमाती साठी एकूण जागा तीन, त्यापैकी महिलांसाठी आरक्षित दोन
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण जागा 34 त्यापैकी महिलांसाठी 17 आरक्षित.
सर्वसाधारण एकूण जागा 71, त्यापैकी 35 जागा महिलांसाठी आरक्षित.

प्रभागातील जागा निहाय आरक्षणाचा तपशील खालील प्रमाणे

प्रभाग क्रमांक 1 तळवडे आयटी पार्क
अ नागरिकांचा मागासवर्ग,
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2 चिखली गावठाण कुदळवाडी जाधववाडी
अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3 मोशी गावठाण डुडुळगाव
अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4 दिघी समर्थ नगर कृष्णा नगर बोपखेल
अ अनुसूचित जाती महिला
ब अनुसूचित जमाती
क नागरिकांचा मागासवर्ग महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर रामनगरी संत तुकाराम नगर
अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 6 सद्गुरु नगर चक्रपाणि वसाहत
अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7 सँडविक कॉलनी भोसरी गावठाण
अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8 केंद्रीय विहार जय गणेश साम्राज्य
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 9 अंतरिक्ष सोसायटी विठ्ठल नगर
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10 शाहूनगर संभाजीनगर एचडीएफसी
अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11 कृष्णा नगर कोयना नगर
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर त्रिवेणी नगर
अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13 सेक्टर नंबर 12 यमुना नगर निगडी गावठाण
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14 काळभोर नगर मोहन नगर आकुर्डी
अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15 वाहतूक नगरी सेक्टर 24 26 27 गंगानगर
अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 16 मामुर्डी किवळे विकास नगर रावेत गुरुद्वारा
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकर वाडी चिंचवडे नगर बिजलीनगर दळवी नगर भोईर नगर
अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 18 पवनानगर रस्टन कॉलनी वेताळ नगर चिंचवड गावठाण केशवनगर
अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 19 उद्योग नगर सुदर्शन नगर श्रीधर नगर आनंद नगर
अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 20 संत तुकाराम नगर महात्मा फुले नगर महेश नगर याची विशाल कासारवाडी कुंदन नगर
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 21 पिंपरी गाव अशोक चित्रमंदिर, वैष्णव देवी जिजामाता मिलिंद नगर
अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 22 विजयनगर पवनानगर नढे नगर
अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 23 शिवतीर्थ नगर समर्थ नगर पडवळ नगर सुंदर कॉलनी
अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 24 गणेश नगर म्हातोबा नगर पदमजी पेपर बिर्ला, साई कॉलनी पडवळ नगर
अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 25 पुनावळे ताथवडे भुमकर वस्ती वाकड काळा खडक
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलक कस्पटे वस्ती विशाल नगर वेणू नगर वाकड
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 27 तापकीर नगर श्रीधर नगर बळीराम गार्डन रहाटणी, सिंहगड कॉलनी लक्ष्मीबाई तापकीर शाळा
अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर परिसर
अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 29 क्रांतीनगर जवळकर नगर शिवनेरी गुलमोहर ओंकार कॉलनी वैदु वस्ती
अ अनुसूचित जाती महिला
ब अनुसूचित जमाती महिला
क नागरिकांचा मागासवर्ग
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 30 दापोडी फुगेवाडी कुंदन नगर सिद्धार्थ नगर कासारवाडी
अ अनुसूचित जाती
ब अनुसूचित जमाती महिला
क नागरिकांचा मागासवर्ग
ड सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक 31 नवी सांगवी कीर्ती नगर विनायक नगर कवडे नगर गजानन महाराज नगर
अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 32 सांगवी गावठाण मधुबन ढोरे नगर जयमाला नगर पीडब्ल्यूडी कॉलनी
अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×