खंडणी विरोधी पथक दोनच्या कारवाईत पिस्तुलधारकास अटक
Marathinews24.com
पुणे – पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गणेश आप्पा मकवाने (वय २४ रा.गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक सिंहगडरोड पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.खंडणी विरोधी पथक दोन हद्दीत २६ एप्रिलला पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीची माहीती मिळाली.
कबुतराला मारत असताना तृतीयपंथीयाचा गोळीचा नियम चुकला – सविस्तर बातमी
आरोपी गणेश आप्पा मकवाने याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो वडगाव बुद्रुकमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.खबर मिळताच खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी व अंमलदार त्याठिकाणी रवाना झाले. गोसावी वस्तीच्या मागील कॅनल लगत पायवाटजवळ आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि राऊंड मिळाला. त्याच्याविरूध्द सिंहगडरोड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, पवन भोसले, संग्राम शिनगारे यांनी केली आहे.