Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनाचा बदला घेण्याचा कट उधळला

माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनाचा बदला घेण्याचा कट उधळला

खून प्रकरणातील आरोपीच्या निकटवतीयांच्या घरावर पाळत

marathinews24.com

पुणे – मजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला घेण्याचा कट भारती विद्यापीठ पोलिसांनी उधळला. आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह साथीदार धनकवडीतील आंबेगाव पठार भागात आहेत. गायकवाड याच्या निकटवर्तीयांचा खून करण्याच्या तयारीत आंदेकर टोळीतील सराइत असल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांन आंबेगाव पठार परिसरातून एकाला अटक केली. दत्ता बाळू काळे (सध्या रा.डोके तालीमजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी – सविस्तर बातमी 

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम चौकात पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. नाना पेठेतील आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला शह देणे, तसेच वैमनस्यातून सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांनी साथीदारांच्या मदतीने आंदेकर यांचा खून केला होता. आंदेकर याची माहिती आरोपींना दिल्याप्रकरणी आंदेकरची बहीण, मेहुण्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावािरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे.

आंदेकर यांच्या खून प्रकरणाला सोमवारी (१ सप्टेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत आंदेकर टोळीतील सराइत तयारीत होते. धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात काळे फिरत होता. त्याने काही घरांची मोबाइल कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे काढली होती. याबाबतची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून काळे याला पकडले. काळे याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने वनराज आंदेकरच्या खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली.
वनराज आंदेकरच्या भावासह साथीदारांविरुद्ध

तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी याप्रकरणी काळे याच्यासह वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर, भाचा स्वराज वाडेकर, तसेच दत्ता बाळू काळे, यश मोहीते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगु, अमित पाटोळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी सागर बोरगे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांनी ही कामगिरी केली.

तीन महिन्यांपासून ठेवली पाळत

अटक केलेला आरोपी दत्ता काळे याला २०१८ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. कारागृहात असताना त्याची अंदेकर यांचा भाचा स्वराज वाडेकर याच्याशी ओळख झाली होती. काळे याला बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर तो आंदेकर टोळीच्या संपर्कात आला. वनराज आंदेकर यांचा भाऊ कृष्णाला त्याला खर्चासाठी पैसे द्यायचा. काळे याला डोके तालीम परिसरात राहण्यासाठी खोली दिली होती. गेल्याा तीन महिन्यांपासून आरोपी यश मोहिते हा आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या आांदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या घराची पाहणी करत होते.

खून प्रकरणातील आरोपीच्या निकटवर्तीयांवर मोेहिते आणि काळे यांनी पाळत ठेवली होती. ३० ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास काळे याने आंबेगाव पठार परिसरासतून कृष्णा आंदेकर याच्या मोबाइलवर संपर्क साधला. कृष्णा आणि काळे हे एकमेकांच्या संपर्कात होते. आंदेकर टोळीतील सराइत कोणाचा खून करणार होते, याबाबत तपास सुरू आहे. तपासात आरोपींनी पिस्तुले खरेदी केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या एककडे सोपविण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×